Pages

Subscribe:

Tuesday, September 21, 2010

कोणताही विषय web वर शोधत (search) असताना तुम्ही search engine (Google - माझ्या आवडीचे) पासून सुरुवात करता. मी तुम्हाला दोन प्रसिद्ध blog search engine ची नांवे सांगतो.

०१. Technorati
०२. Google Blog Search

या दोन्हीही websites तुम्हाला advance search functions देतात आणि हीच blog चालू करण्याची पहिली जागा होय.

Technorati.com हे search engine “Authority” (अधिकार) नुसार तुम्हाला result देते आणि
Blogsearch.Google.com हे “Author” (लेखक) नुसार result देते.

तुम्ही कोणताही विषय याने शोधला अथवा search केला आणि त्यावर click केले की त्या search result चे webpage तुमच्या स्क्रीनवर झळकेल. आता इथे सर्वात महत्वाची गोष्ट मी तुमच्या नजरेसमोर आणून देऊ इच्छितो आणि ती म्हणजे :

त्या webpage वर असलेला मजकुर ज़रा नीट पहा. पहाताना लिहिलेल्या मजकुराची size आणि colour त्याचप्रमाणे त्या पेज ची background पहा. याचाच अर्थ असा की, तुम्ही पाहत असलेल्या मजकुराची size, colour आणि त्या पेज ची background ही डोळे दुखविणारी नसावी (वाचत असतानाइथे तुमच्या सारख्याच इतर वाचकांचा विचार होणे अभिप्रेत आहे). तेव्हा blog तयार करताना याचा विचार होणे अत्यंत आवश्यक आहे.

दुसरे असे की, तुम्ही लिहिलेला मजकुर [(Article (लेख) किंवा Review (परिक्षण) किंवा post म्हणा हवे तर] हा अगदी सहज आणि सुलभ रित्या वाचकांसमोर येणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी mouse चे scrolling button जास्त फ़िरविण्याची वेळ यायला नको (हो ना! बरेचदा असे घडते की, लिहिलेला मजकुर वाचन्यापुर्वीच हातांची बोटे दुखायला लागतात. असा दुस-यांना शारीरिक त्रास देणारा blog काय कामाचा? बरोबर आहे ना?).

Blog चा layout (आराखडा) हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. हा blog चा layout असा असायला नको की ज्यामधे जास्तीत जास्त ads आणि links यांचा सुळसुळाट झालेला असेल. (links च्या बाबतीत बोलायाचे झाल्यास blog लिहिणा-याच्या मते काही ठिकाणी links ब्लाँगवर टाकणे हे सुद्धा महत्वाचे आहे) यासाठी तुम्ही News-N-Views अथवा India On wheels या blog चा ही संदर्भ घेऊ शकता.

तुम्ही लिहिलेले लेख चांगले आहेत असे गृहीत धरुयात. आता तुम्ही कोणत्याही विषयावर लिहिलेली एखादी post Blog search engine मध्ये search करुन पहा. तुम्हाला असे दिसून येइल की तुम्ही लिहिलेल्या post सारख्याच -याचशा पोस्ट या link च्या स्वरूपात ते search engine स्क्रीनवर दाखवेल. त्यातील कोणतीही post click करुन बघा आणि वाचा. आणखी एकदोन त्याच विषयावरील post वाचल्या तरी चालेल. शेवटी तुम्हाला असे दिसून येइल की, एकाच विषयावर वेगवेगळ्या ब्लाँगरनी वेगवेगळ्या पद्धतीने तो विषय हाताळला आहे. माझ्यामते यालाच लिहिण्याचे मुक्तस्वातंत्र्य असे म्हणतात. याचाच अर्थ तुम्ही वाचलेल्या त्या पोस्टपैकी कोणती post तुमच्या मनाला भावली हे महत्वाचे. कारण ज्या कोणी ब्लाँगरने ती post लिहिलेली असेल त्या वेळेस काय बरे घडले असेल?

याचे उत्तर एकच! त्या ब्लाँगरचेविषयाशी तादात्म्य पावणे!”. वेगळ्या आणि सोप्या भाषेत सांगायचे झाल्यासकोणतीही Blog post लिहित असताना त्या विषयाबरोबर तुमची असलेलीattachment” (जिव्हाळा) हीच खरी महत्वाची.” असे जर नेहमी घडत राहिले तर तुमच्या ब्लाँगला भेट देणा-यांचे प्रमाण काही हजारांच्या पटित असेल हे नक्की. मग तो Blog English, Hindi, Marathi वा अजुन दुस-या कोणत्याही भाषेतील असो काही फरक पडत नाही.

Yayaatiइथे लक्षात ठेवण्यासारखी एकच गोष्ट आहे ती म्हणजे तुमची स्वत:ची एक लिहिण्याची ख़ास पद्दत विकसित व्हायला हवी. त्यासाठी मी इथे तुम्हाला एक सुचवितो की तुम्ही (Marathi Bloggers) एकदा तरीययातिया कादंबरीचे सुप्रसिद्ध लेखक "श्री. वि. . खांडेकर" एकदा अवश्य वाचा. त्यांचे त्या पुस्तकातील logic हाच माझा Blog लिहिण्यामागील पाया आहे. कदाचित नाहीच जमले तर त्यापेक्षाही वेगळी तुमची स्वत:ची अशी एक लेखणशैली तुम्ही नक्कीच तयार करू शकाल यात शंकाच नाही. यासाठी मी तुमच्या आणि माझ्या शालेय जीवनात डोकावण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहे. बघुयात! काही जमते का ते?

इयत्ता सातवी, आठवी, नववी आणि दहावी यातून आपण सर्वजण पार पडलो आहोत. या इयत्तेत शिकत असताना इंग्रजी, हिंदी आणि मराठी निबंधलेख़णाची वेळ जरा आठवून बघा. आठवतंय का काही? नक्कीच आठवत नसेल.

ज़रा आठवून बघा! या वेळेस तुमची आणि आमची उडालेली त्रेधातिरपीट. एका विषयावर लिहायला दिलेला काय तो निबंध. पण तो लिहित असताना सुद्धा घाम निघायाचा. निबंधाला सुरुवात करतानाप्रस्तावना कशी करायची?, कोण-कोणते मुद्दे लक्षात घ्यायचे? त्या निबंध विषयाला अनुसरून काय संदेश द्यायचाय?, आणि शेवटी त्या निबंधाचा समारोप कसा करायचा?. या गोष्टिंसाठी आपणGuideचा वापर भरपूर प्रमाणात केलेला आहे. हीच खरी मेख आहे Blog लिहित असताना.

म्हणजे पहा, जरा ते निबंधाचे स्पेशल guide उघडून बघा आणि त्यातील कोणताही एक तुमच्या आवडीचा निबंध वाचून काढा आणि स्वत:साठी मनन करायाला मिनीटांचा वेळ द्या. खरेतर त्यातील ते सार तुम्हाला एक वेगळी अनुभूति देऊन जाते. तीच अनुभूति तुमच्याही वाचकांना व्हायला हवी तेव्हाच तो तुमचा Blog प्रसिद्ध पावेल यात शंका नाही.

अजुन काही वाचनीय लेख:
01. Blog : Learn And Earn (ब्लॉग - शिका आणि कमवा)
02. What is Blog? (ब्लॉग म्हणजे काय?)
03. Blog : Read and Earn More (ब्लॉग : जेवढे वाचाल तेवढे कमवाल)
04. Blog : An Experience (ब्लॉग : एक अनुभव)
05. Just Consider Learning Styles When Blogging (ब्लाँगिंगची Learning Style का गृहीत धरावी लागते?)
06. Before Moving Towards Blogging (ब्लॉगिंग कडे जाण्यापुर्वी)

07. The Uses of Blogs (ब्लॉगचे उपयोग)
08. Types of Blogs (ब्लॉगच्या पद्धती)
09. Blog Statistics (ब्लाँग सांख्यिकी आणि इतर काही माहिती)

0 Comments:

Post a Comment