Pages

Subscribe:

Sunday, February 23, 2014

हे सांगायची गरज नाही की,  blogging हा विषय पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानावर (modern technology) अवलंबून आहे.  इथे अशी एक शक्यता असते कि  तुम्ही त्यामुळे कुठेतरी कमी पडू शकता आणि ती म्हणजे त्रुटी (errors).  सहसा, तांत्रिक चुका (technological errors) हा तुमचा blog मागे पडूशकण्यासाठी कारणीभूत होतो. त्यामुळे तुमच्या blog चे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते त्यासाठी तुम्ही या तांत्रिक चुकांच्या जाळ्यात पडता कामा नये. 

जेव्हा तुम्ही तुमच्या blog च्या माध्यमातून वाचकांपर्यंत  पोहोचण्याचा प्रयत्न करीत असता तेव्हा तुमच्याकडील चांगल्या साहित्याची नितांत गरज असते. त्यासाठी तुमचा blog हा अशा प्रकारचे communication gap ची दरी भरून काढण्यासाठीचा एक महत्वाचा रोल बजावू शकतो. 

Blogging करीत असताना टाळता येण्याजोग्या काही सामान्य तांत्रिक चुका मी इथे विशद करीत आहे. 

१. The Absence Of An RSS Feed (RSS Feed ची अनुपस्थिती):

RSS  हे Real Simple Syndication चे संक्षिप्त रूप आहे. सहसा ते आपल्या लक्षात येत नाहि. परंतू ते  उपलब्ध असलेले एक महत्वाचे technological tool आहे जे तुमचा Blog लोकांपर्यंत खूप चांगल्या आणि परिणामकारक पद्धतीने पोहोचवू शकतो. 

सोप्या भाषेत सांगायचेच झाले तर, RSS हे तुमच्या blog च्या content ला standardize करते जेणेकरून ते blogging च्या कोणत्याही platform वर वापरता येऊ शकेल. किंवा तुमच्या वाचकांपर्यंत सादर होण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. 

२. Not Going Mobile (सर्वदूर न पोहोचणे):

Technology च्या term मध्ये बोलायचे झाल्यास,  हा एक technology मधील क्रांतिकारक बदल आहे जो आज एक mobile technology मधील मोठी बातमी झाला आहे. 

आज, mobile वर internet access करण्यासाठी लोकांचा एक मोठा वर्ग अवलंबून आहे, blog च्या बाबतीत वेगळे असे काही सांगायची गरज नाहि. त्यामुळे blog ची design फायनल करताना, तुमचा blog प्रतिक्रिया दर्शविणारा (responsive) आणि mobile जसे कि smartphone वा tablet वर चालणारा आहे याची खात्री करणे गरजेचे आहे.

तुमच्या blog ला वारंवार visit करणारे वाचक काही वेळेस दुर्लक्ष करण्याची शक्यता असते, त्यामुळे, पहिल्यांदाच तुमच्या blog चे page open करणा-या वाचकास तुमच्या blog चा कमी समाधानकारक अनुभव येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तुमच्या blog ला मिळणारा unique वाचकवर्ग  हा परत मिळविण्यासाठीच्या संधी परिणामकारकरीत्या कमी होऊ शकतात. 

३. Performing Recovery Task On Backed Up Data As Well (Backed Up Data वरील performing recovery task):

आपण आपला data backup मध्ये न ठेवल्यास, blog चे हे मोठे network सर्वप्रथम आपला हा backup data विश्वसनियरित्या backup करून ठेवण्याची शिफारस करीत असतो. 

४. Failure To Test Your Site Across Varied Browsers (वेगवेगळ्या browsers वर तुमचा blog / site ची  अयशस्वी चाचणी):

तुमचा blog व्यवस्थित दिसतो कि नाही हे पाहण्यासाठी तुम्ही जेव्हा तुमच्या blog ला visit करता तेव्हा तो तुम्ही जेव्हा पासून जे browser application वापरता त्या-त्या  प्रत्येक वेळी अगदी व्यवस्थित असल्या सारखा वाटतो. तथापि, तुमचे सर्व वाचक तुम्ही वापरत असलेले समान web browser application वापरतिलच असे नाही. त्यामुळे तुम्ही तुमची blog site हि वेगवेगळ्या web browser application वर ज्यामध्ये Firefox, Chrome, Safari विशेषत: Internet Explorer ज्यावर ब-याच वाचकांना तुमचा blog न शोधता येणे यासारखे issue येऊ शकतात त्यासाठी test करणे आव्यश्यक आहे.

या वरील ४ बाबी blogging करीत असताना लक्षात घेणे आव्यश्यक ठरते. त्यामुळे ह्या बाबी लक्षात ठेवा तूर्त सध्या एवढेच. नंतर भेटूयात पुढील काही महत्वाच्या लेखांबरोबर. 

मूळ लेख How you can miss out on some important aspects when blogging चा मराठी स्वैर अनुवाद.

Thursday, November 28, 2013

एक नविन लेखक म्हणून; रोजनिशी लिहिण्यासाठी तुम्हाला काही टिप्स आत्मसात करायला हव्यात. तुमच्या लिहिण्याच्या ध्येय यावर आधारित तुम्हाला तुमचे विचार किंवा भावना वर्णन करण्यासाठी तुम्ही तुमचे खाते सुरू करा. कविता किंवा लघुकथा लिहा, किंवा मग तुम्ही तुमची लेखन क्षमता वाढवू शकता. 

या गोष्टींचा तुम्ही तुम्हाला हवा तो अर्थ काढू शकता, इथे मी तुमच्यासाठी रोजनिशी सुरू करण्यासाठी ९ उपयोगी सूचना देत आहे (Nine helpful tips to start writing a journal).

०१. दररोज लिहा (Write Everyday):

मला तरी असे सुस्पष्ट दिसत आहे कि, हि रोजनिशी लिहिण्याची सुरूवात आहे. जे काही असेल ते, तुमच्या रोजनिशी मध्ये लिहा. तुमचे विचार, भावना, तुमच्या डोक्यात जे काही येत असेल ते लिहा. हे सर्व तुम्हाला तुमच्या लिहिण्याची सवय तयार करण्यास मदतच करेल. खरेतर हे म्हणजे तुमच्यासाठी पुढे जाण्याचा एक मार्गच आहे.

०२. हे सर्व तुमच्या बरोबर घेऊन चला (Carry it with you):

अर्थातच! यामुळे तुम्हाला दररोज लिहिण्याची सवय लागेल. मी नेहमी एक छोटीशी नोटबूक जी माझ्या खिशात सहजपणे मावेल ठेवत असतो. ती नोटबुक मला नेहमी काहीतरी लिहिण्यासाठी स्मरण करून देते. तुम्ही जर तुमची रोजनिशी लिहिण्याचे विसरलात तर तुम्ही काही नोट्स तुमच्या सेल फोनमध्ये घेऊन त्या नंतर रोजनिशी लिहिण्यासाठी वापरू शकता. 

०३. तुमच्या सेल फोनवर रीमाइण्डर सेट करून ठेवा (Set a Reminder on Your Phone):

बाकी लोकांसारखे (जिकडे जाईल तिकडे) मी माझा सेलफोन माझ्या बरोबरच ठेवतो. कारण माझ्या गरजा भागविण्यासाठी मी अनेकदा त्याच्या वापर करू शकतो. प्रत्येक काही तासानंतर रोजनिशी लिहिण्यासाठीचे स्मरण करून देण्यासाठी मी टाइमर लावून ठेवत असतो. ते प्रत्येक वेळेस रिंग वाजवून मी करत असलेले काम थांबायला लावते आणि एक मिनिट रोजनिशी लिहिण्यासाठी वापरायला लावते. 

०४. एक चांगली रोजनिशी लिहायला हवी (Have a Cute Journal):

जेव्हा तुम्ही एक चांगली रोजनिशी लिहिण्याचे ठरवता तेव्हा त्या पानांना तूमच्या लिहिलेल्या विचारांनी आकर्षकपणा येतो. मला माझ्या एका मित्राने एक नोटबुक दिले आहे ज्याचे पहिले आणि शेवटचे पृष्ठ सुशोभित केलेले आहे. ते नोटबुक मला त्यामध्ये लिहावे यासाठी नेहमी उद्धुक्त करत असते. मी देखील त्यामध्ये एका विशेष पेनाने ती रोजनिशी लिहित असतो आणि ती नेहमी माझ्याबरोबर ठेवत असतो. याच प्रकारे, रोजनिशी लिहिणे म्हणजे एक प्रकारचा भव्य प्रसंग असतो याची नेहमी मला प्रचीती येत असते. 

०५. अधिक वाचा (Read More):

वाचन हे तुमचे विचार आणि कल्पना ढवळून काढण्यास मदत करते, जे नंतर एक रोजनिशिमधील सुंदर लेखन बनून जाते. वाचन हे आपल्याला आपले विचार, मत विस्तृत करण्यास मदत करते. वाचन हे आपल्याला माहित नसलेल्या गोष्टींचे आव्हाने स्वीकारायला तसेच नवीन दृष्टांत मिळविण्यासाठी मदत करतात. कोणतेही एक जुने गाजलेले पुस्तक उचला किंवा एखादे नवीन पुस्तक जे तुम्हाला नेहमी वाचावयास आवडते तिथून सुरुवात करा. जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर इंटरनेटवर काही लघुकथा किंवा कविता शोधा आणि वाचा. "वाचाल तर वाचाल" हि म्हण लक्षात असू द्या. 

०६. शब्दांबरोबर खेळा (Play with Words):

अलीकडे मी अधिकाधिक चटकन लिहून घेतलेल्या छोट्याशा टिप्स यांची लिस्ट करत असतो आणि त्या टिप्स एकत्र करून त्यामधून एक संलग्न आणि अर्थपूर्ण विचार मांडायचा प्रयत्न करत असतो. कधी कधी हा प्रयत्न चालून जातो, कधी चालत नाही. या सगळ्याचे सार एकच, ते म्हणजे, हे शब्द (शब्दांचे हे खेळ) एकमेकांबरोबर कसे काम करतात याचा तुमच्या मनात विचार सुरू करण्याची प्रक्रिया करत असतात. मी जेव्हा अडखळतो तेव्हा मला मदत करते ती मी तयार केलेली लिस्ट, परत मी त्या तयार केलेल्या लिस्ट कडे जातो आणि हे पहातो ( रोजनिशी लिहिण्यासाठी) कि कोणते शब्द चालतात आणि कोणते नाहीत. 

०७. तुमच्या भोवतीच्या सर्व बाबींची नोंद घ्या (Take Note of Everything around You):

कधीकधी मी दररोज आयुष्यात घडत असलेल्या गोष्टीं लिहित असतो, किंवा मी कार्य करीत असताना जे नेहमी पहातो ते लिहित असतो. सभोवतालच्या या गोष्टी नंतर मला लघुकथा किंवा कविता करण्यास प्रेरणा देतात. याचबरोबर या गोष्टी मला जगात चाललेल्या गोष्टींची दाखल घेण्यास भाग पाड्तात. रोजनिशी लिहिण्यासाठी हि एक सुंदर आणि प्रेरक गोष्ट आहे. या विविध प्रकारच्या व्यायामाचे सार एवढेच कि, हे सगळे तुम्हाला सर्व वेळ लिहित रहाण्याची, किमान विचार करण्याची संधी देते.

०८. लेखकाच्या जागेची काळजी करू नका (Don't Worry about Writer’s Block!):

लेखकांची जागा हि प्रत्येक लेखकासाठी एक नैसर्गिक अनुभव असतो. या प्रक्रियेस आलंगण  देऊन त्याचा आनंद घ्या. असे जर घडले तर, रील्याक्स रहा. लेखन हे छोटेसे काम नसून ती एक गंमत असते. जर तुम्हाला एखाद्या दिवशी लिहावेसे वाटत नसेल तर काही हरकत नाही. कदाचित तुम्ही त्या दिवशी निसर्गाच्या सानिध्यात फिरावयास जा, किंवा मग वाफाळलेल्या चहाबरोबर शांतपणे एका ठिकाणी बसून पुस्तक वाचा. कुणास माहित? हि गोष्ट तुम्हाला लेखनाच्या विभागात कदाचित मदतही करेल!

०९. प्रारंभ (Start):

आज, आत्ता लगेच सुरुवात करा. तुम्हाला नेहमी जे काहीतरी करावयाचे होते त्यासाठी "आत्ता" हीच सर्वोत्तम वेळ आहे. जरी ते तुम्ही restaurant मधील napkin च्या तुकड्यवरिल लिहिलेले असेल अथवा सुंदर अशा लेदरचे आवरण असलेल्या रोजनिशी मध्ये लिहिलेले असेल, प्रत्यक्षात लिहिणे सुरु करा. उर्वरित टिप्स या तुम्हाला लिहिण्याची सवय जोपासण्यासाठी नक्कीच मदत करेल.

Tuesday, May 01, 2012

Godaddy.com and Their Promo Codes

Hello friends,

The world knows that GoDaddy is one of the most popular hosting companies in the world today. You know what the reason? Yeah! Because of their cheap prices and somewhat notorious advertising campaigns. Many domains available through GoDaddy do not exceed $10 per year. If you are wondering how these prices compare to other comparable services, then consider what else that GoDaddy offers along with their primary product. Now they bring new Promo Codes for your services, Just get the fantastic opportunity and stay with it.

7.99$ .com domain registration
cjc799chp
Save 5$ off your order 30$ or more
cjcchp30
Save 10$ off your order 50$ or more
cjcchp50
Save 15% off your order 75$ or more
cjcchp75
Save 20% off hosting
cjcchp20

all codes are valid and has no expiry dates. All codes are for new registrations. Not valid for renewals.godaddy promo code

Thursday, February 23, 2012

मित्रांनो, ब्लॉगचे नांव हे त्या ब्लॉगसाठीचे हृदय असते यात काही शंकाच नाही. ब्लाँगचे नांव हा एक महत्वाचा घटक असून तो तुमच्या ब्लॉगला आणि अर्थातच तुम्ही लिहिलेल्या लेखांना एक नवा आयाम देत असतो. त्यामुळेच आकर्षक ब्लॉगची नावे ही त्या-त्या ब्लॉग पोस्टला अथवा त्या ब्लॉगचा लेखांना दिली जातात. त्यामुळे वाचकवर्ग हा त्या आकर्षक ब्लॉगच्या नावांना अथवा लिहिलेले लेख वाचून त्याकडे आकर्षित होतो आणि नेहमी तुमचा ब्लॉग तपासत असतो. या वाढलेल्या वाचक वर्गामुळे तुमचा हा ब्लॉग search engine मध्ये महत्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे खरेतर आकर्षक ब्लॉगचे नाव लिहिणे हे खूप सोपे असते.

ब्लाँग चे नांव निवड़्ण्यापुर्वी तुम्हाला ब्लॉग चे title आणि domain name मधील फरक कळणे आवश्यक आहे. ब्लाँगचे नांव शोधताना बहुतांशी ब्लॉग वाचकांचा गोंधळ उडत असतो तो केवळ ब्लाँग चे title आणि domain name यातील फरक न कळाल्यामुळेच. त्यामध्ये त्या ब्लाँग ची URL ही सुद्धा एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे ब्लाँग चे आकर्षक नांव निवड़ताना प्रथम तुमच्या डोक्यातील तसेच मनातील हा गोंधळ दूर होणे आवश्यक आहे.

Domain Name किंवा त्या ब्लाँग ची URL ही तुमचा ब्लाँग ओळखण्याची महत्वाची खुण आहे. म्हणजेच असा शब्द जो तुम्ही कोणत्याही Internet Browser च्या address bar वर जाउन टाइप करता आणि मग तो ब्लाँग समोर येतो. जसे की जर तुम्हाला Facebook या वेबसाइट वर जायचे असेल तेव्हा तुम्ही www.Facebook.com हा address, address bar वर टाइप करता जो तुम्हाला Facebook या site वर घेउन जातो. हे लक्षात ठेवा की प्रत्येक URL ही इतरांपासून वेगळी असते त्यामुळे एक URL ही दोन वेगवेगळ्या website ना एकच असेल असे कधीही होत नाही.

त्यामुळे आकर्षक आणि सहज समजणारे, लक्षात रहाणारे domain name शोधताना या गोष्टी लक्षात ठेवा.

Blog title हे दुसरे काही नसून तुमच्या ब्लाँग चे नांव असते जे तुम्ही ते टाइप केल्यानंतर browser च्या title bar वर दिसून येते. जेव्हा जेव्हा तुम्ही त्या-त्या website ला भेट देत असता तेव्हा तेव्हा तुमच्या ब्लाँग चे title हे तुम्हाला त्या website च्या वर आणि address बारच्या खाली दिसून येते.

स्वत:चा ब्लाँग प्रसिद्ध करण्यासाठी (popular करण्यासाठी) आणि तुमच्या ब्लाँगचे वाचक वाढण्यासाठी ब्लाँग ला आकर्षक (आठवणीत राहील असे) चटकन लक्षात रहाण्याजोगे नांव देणे हा एक महत्वाचा घटक ठरत असतो.

त्यामुळेच आजचा हा लेख तुमच्यासाठी लिहित आहे. ब्लाँगला नांव देण्यापुर्वी खालील काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात.


१. तुम्ही तुमच्या ब्लाँग चे किती आणि कसे वेगळेपण जपणार आहात?
२. त्यामधून समाजाला काय संदेश देणार आहात?
३. त्यातील चित्र (images) सुसंगत संदेश देणार आहेत काय?
४. तुमच्या ब्लाँग वर एक नजर टाकल्यानंतर त्यातील कोणता भाग हा तुमच्या लक्षात रहाणारा आहे?

हे वरील सर्व महत्वाचे घटक ब्लाँग ला नाव देताना लक्षात ठेवावे लागतात. खरेतर ब्लाँगला नाव देताना ब्लाँग चा विषय आणि तेव्हा तुमची असलेली मानसिकता ही महत्वाची ठरू शकते.

ब्लाँग चे नांव हे -

- वाचतायेण्याजोगे असावे
- सहज उच्चारण करता येण्याजोगे असावे
- सहज लिहिता येण्याजोगे असावे
- सहज लक्षात राहील असे असावे
- थोड्क्या शब्दांत बरेच काही सांगणारे असावे
- वेगळेपण जपणारे असावे

या पुढे ही मी असे म्हणेन की, ब्लाँग चे नांव हे तुम्ही काय मत व्यक्त करणार आहात त्याचा तो एक सुंदर आरसा असावा.

उदाहरणच जर द्यायचे झाले तर, माझा "India On Wheels" हा ब्लाँग पहा. यामध्ये पर्यटन (tourism, tour, travel, accommodation, वगैरे. ) या विषयावरिल लेख आहेत. आपल्याला जर “Palace On Wheels” हे माहीत असेल तर “India On Wheels” हे चटकन लक्षात रहाते आणि हो Google मध्ये “India On Wheels” सर्च करताना माझा हा ब्लाँग पहिल्या एका लिंक मध्ये दिसू शकतो.

ब्लाँगच्या मार्फ़त फ़ायदा करून घेण्यासाठी वाचक वर्ग मिळविण्यासाठी चे माझे एक साधे गणित आहे.

“लक्षात रहाण्याजोगे ब्लाँग चे नांव ठेवा आणि तसे तुमचे मत त्यातून व्यक्त करा”

आकर्षक ब्लाँग चे नांव = तुमचा वाचक वर्ग + फायदा

हेच ते एक सूत्र आहे.

ब्लाँग साठी आकर्षक नांव शोधण्याच्या या मोहिमेत तुम्ही सर्वानी खालील गोष्टींवर विचार करणे गरजेचे आहे.

- तुमचा ब्लाँग कोणासाठी आहे
- यामधून तुमच्या ब्लाँग वाचकांचा काय फायदा होणार आहे
- तुम्ही तुमच्या ब्लाँग मधून काय व्यक्त करणार आहात.
- तुमची तुमच्या ब्लाँग चे नांव कशा प्रकारे आणि कुठे वापरणार आहात.

याव्यतिरिक्त तुम्हाला जर अजून काही माहिती असेल तर तुम्ही इथे comments च्या स्वरूपात शेयर करू शकता.

तुमच्या मनात नक्की काहीतरी चांगले असलेच तरीही माझ्या या खालील ३ टिप्स आकर्षक ब्लाँग चे नांव निवडताना लक्षात ठेवाव्यात.

०१. सकारात्मक विशेषणांचा वापर करा

विशेषण हे वाचकांच्या मनात तुमच्या ब्लाँग बद्दल एक संदर्भ चित्र निर्माण करत असते. त्यामुळे अशा विशेषणांचा वापर करा की त्यातून सकारात्मक भावना या तुमच्या मौल्यवान वाचकांपर्यंत पोहोचतील.

२. ब्लॉग चे नांव छोटे आणि सहज ठेवा : Keep It Short And Simple (KISS)

होय! KISS अर्थात (Keep It Short And Simple) म्हणजेच छोटे आणि सजह लक्षात रहाण्याजोगे. हा एक महत्वाचा घटक आहे हे लक्षात असू द्या. ब्लाँग चे नांव असे निवडा की ते सहजरित्या समजण्यास आणि आठवणीत रहाणारे असावे. लोकांनी जर तुमच्या ब्लाँग बद्दल बोलावे असे वाटत असेल तर ब्लाँग चे नांव हे सहज आणि सोपे असावे.

३. Enjoy And Be Creative (क्रियाशील रहा)

ब्लाँग साठी अचूक किंवा perfect नांव असावे या साठी आग्रही राहू नका आणि त्यासाठी स्वत:चे डोकेही शिणवु नका. जास्त डोके शिणल्याने तुमची क्रियाशीलता (Creativity) कमी होण्याची शक्यता आहे. त्याऐवजी तुम्ही जो काही ब्लाँग लिहिणार असाल त्या ब्लाँग च्या संहितेवर (विषयावर) लक्ष केंद्रित करा.

शेवटी सांगेन की, तुमचा ब्लाँग हा तुमचे प्रतिबिंब आहे. ही एक अशी ब्लाँगची दुनिया आहे की जिथे तुम्ही तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टी घेउन व्यक्त होत असता त्यामुळे लोक तुमच्या बाबतीत तुम्ही किती चांगले अथवा वाईट ब्लाँगर आहात हे ठरवित असतात.

So, Happy ब्लॉगिंग..!!!

सौजन्य : How to create catchy blog names

हे सुद्धा वाचा :

०१. 18 Resources to Help you Write Better Blog Titles

०२. How to Title a Blog?

०३. How To Write a Good Blog Title for High Website Traffic

०४. 50 Article/Blog Title Ideas For You

०५. What do YOU call your blog? — Elliott C. Back

०६. Title Tags - Is 70 Characters the Best Practice? - Whiteboard Friday ..

०७. How to Craft Post Titles that Draw Readers Into Your Blog ...

Monday, January 02, 2012

Happy New Year 2012

माझ्या सर्व ब्लॉग वाचकांना

नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा...

haapy new year 2012

आपला

माझी ब्लॉग शाळा

;;