जुन्या काळी बरेचसे पालक आपल्या शाळेत जाणा-या मुलांना रोजनिशी लिहिण्याचा सल्ला द्यायचे. याचे दोन फायदे होते. एकतर, मुलांचे भाषाकौशल्य आणि हस्ताक्षर सुधारण्यास मदत होत असे. फायदयाच्या चौकटितुन जर याचा विचार केला तर त्याचा असा परिणाम साधायचा की ते त्यांच्या मुलांनी दररोज करीत असलेल्या शालेय वा इतर activities तसेच शाळेत केलेल्या गंमती जमती चे रेकॉर्ड तयार व्हायचे. पुढे काही वर्षानी तो मुलगा मोठा झाला की तीच रोजनिशी तो जेव्हा वाचत असे तेव्हा बालपणाच्या रम्य आठवणींचा पडदा त्यांच्या चक्षु समोर येत असे. तेव्हा नक्कीच त्यांच्या मनात “बालपणीचा काळ सुखाचा” या म्हणीचा प्रत्यय येत असे. ज़रा आठवून बघा तुमचा बालपणीचा काळ! काही आठवतेय कां? नक्कीच नाही. कारण आपण सर्वजण कदाचित संसाराच्या गाडयाला जुंपलो गेलो असूयात अथवा आयुष्यात तग धरण्यासाठी आपली चाललेली धावपळ असेल. या सर्वात ते महत्वाचे म्हणजे आपण अनुभवलेले ते सोनेरी अम्रृततुल्य क्षण आज आपल्या जवळ नाहित. किंबहुना ते आपल्याला आठवत नाहित. त्यासाठीच Diary (रोजनिशी) लिहिणे किती महत्वाचे आहे त्यावरून कळून येईल.
ब्लॉग म्हणजे काय? हया प्रश्नाचे खरेतर उत्तर असुनही ब-याच जणांसाठी हा अनुत्तरित प्रश्न आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आपण ब्लॉग ची व्याख्या मांडू शकतो. अगदी विस्तारीत स्वरूपापासून ते टेक्नीकल भाषेतसुद्धा. ब्लॉग म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर देण्या अगोदर ब-याच हुशार व्यक्तीनी ब्लॉग बाबत केलेली व्याख्या इथे आपण पाहुयात.