सकाळी सहाला डोळे उघडायचो,
रेडिओची मधुर धून कानात शिरायची।
त्या सुरांमध्ये झोप हळूच पळायची,
नव्या दिवसाची चाहूल लागायची॥
मग अभंगवाणीचा गजर व्हायचा,
घरात भक्तीचा दरवळ पसरायचा।
आईच्या ओठांवर गुणगुणणं असायचं,
मन नकळत देवाकडे वळायचं॥
अभंगानंतर मराठी बातम्या,
जगाची ओळख करून द्यायच्या।
वेळ झाली की शाळेची घाई,
दप्तर-पुस्तकं सावरत पळायची॥
त्या साध्या सकाळी, ते निरागस दिवस,
आज आठवणींत हसत येतात।
वेळ पुढे गेला तरी मनात अजूनही,
रेडिओच्या सुरांत बालपण जपून राहतात॥
No comments:
Post a Comment