Tuesday, September 14, 2010

The Uses of Blogs (ब्लॉगचे उपयोग)

Blog
मित्रहो, blogging क्षेत्रात येण्या अगोदर मी असे गृहीत धरतो की तुम्ही माझाBefore Moving Towards blogging (ब्लॉगिंग कडे जाण्यापुर्वी)” हा लेख वाचला असेल. आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करुयात.

बरेचजण जेंव्हा blog सुरु करतात तेंव्हा त्या मागे बरीचशी कारणे असतातकाही जण त्यांच्या आयुष्यात घड़णा-या घटना प्रामाणिकपणे जगासमोर मांडण्यास आसुसलेले असतात. यात त्यांना एक प्रकारचा आत्मसंतोष मिळत असतो. यामुळे होते काय की, हि प्रामाणिकपणे ब्लॉग लिहिणारी व्यक्ति ज्या देशात रहाणारी असेल त्या देशाचे तो अघोषित प्रतिनिधित्वच करीत असतो. त्याच देशातल्या राहाणा-या कुणी हजार जणांचे आयुष्यही त्याने लिहिलेल्या ब्लॉग मधील मजकुरास मिळतेजुळते होउन जाते. आणि मग या व्यक्ति एकमेकांची ओळख नसतानाही या ब्लाँगच्या माध्यमातुन एकमेकांचे सुख़-दुःख share करण्यास पुढे येतात. -याचदा यातून ब्लॉग लिहिणा-या व्यक्तीला मानसिक फायदा होउन तो आयुष्यातील एक-एक कठिण पायरी सांधु लागतो आणि हा ब्लॉग वाचणारी व्यक्ति मानसिकरित्या अजुन सक्षम होत जाते. हो अगदी नकळत... यातून मी गेलेलो आहे. खरेतर माझं life settle करायला या ब्लॉग नावाच्या परसाची खुप मदत झाली आहे. असो!
इथे मला अजुन एक सांगावेसे वाटते की, बरीचशी तुमच्या-आमच्यासारखी सदोदित अंतर्मुख असणारी मंडळीही या ब्लाँगच्या माध्यमातुन बोलकी होताना दिसतात. काही-काही ब्लॉगचा उपयोग एवढा होतो की जिथे प्रसारमाध्यमाचे कोणतेही साधन नाही. तेंव्हा असे ब्लॉग एक मीडिया या स्वरुपात संदेश देण्यासाठी जगासमोर येतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे Chiense Bloggers.

काही ब्लॉग इतर प्रसारमाध्यमांपेक्षाही सहज, सुंदर आणि सोप्या भाषेत बातम्या देण्यासाठी प्रसिध्द आहेत. आपण जर राजकारण करणा-या (political blog) लोकांचे उदाहरण घेतले तर ते अगदी संयुक्तिक राहील. त्या-त्या प्रदेशामधे हे ब्लॉगर लोक तेथील राजकारणी (political) लोकांचा इतिहास, त्यांचे दररोजचे कामकाज हे अशा ब्लाँगवर प्रसिद्ध करीत असतात. हे सर्व कालांतराने निवडणुकीत उभ्या राहिलेल्या त्या व्यक्तिसाठी फायद्याचे (जर ती व्यक्ति चांगली असेल तर) आणि नुकसानकारकही (हे सांगायला नको) ठरू शकते.

अजुन काही वाचनीय लेख:
01. Blog : Learn And Earn (ब्लॉग - शिका आणि कमवा)
02. What is Blog? (ब्लॉग म्हणजे काय?)
03. Blog : Read and Earn More (ब्लॉग : जेवढे वाचाल तेवढे कमवाल)
04. Blog : An Experience (ब्लॉग : एक अनुभव)
05. Just Consider Learning Styles When Blogging (ब्लाँगिंगची Learning Style का गृहीत धरावी लागते?)
06. Before Moving Towards Blogging (ब्लॉगिंग कडे जाण्यापुर्वी)

No comments:

Post a Comment