या सर्व प्रकारामधे कुठून आणि कशी सुरुवात करायची हे जरी माहीत नसले तरी काही हरकत नाही. माझा हा मराठी मध्ये ब्लॉग लिहिण्याचा हाच तर एकमेव उद्देश आहे. मराठी तरुणाई जी आज आपली स्वत:ची अशी एक जागा तयार करण्यास धडपडत आहे. त्यांच्यासाठी तर ब्लॉग हे खरोखर खुप मोठे वरदान आहे. कदाचित हे सर्व वाचून मी अतीशयोक्तिपुर्ण विधाने करीत आहे असेच प्रत्येकाला वाटेल. परंतु म्हणतात ना की, स्वानुभव हाच खरा शिक्षक असतो! तसेच आहे हे!
असो,
ब्लॉगिंग क्षेत्रात माझ्या यशस्वीतेचे गुपित:
इथे, मला माझे गुपित (माझा अनुभव तुम्ही सर्वजण पुढे यावेत या उद्देशाने) मांडायचा आहे. तिन वर्षांपुर्वी मला Blog म्हणजे काय? अथवा या ब्लॉगिंग क्षेत्राशी काडिमात्रही संबंध नव्हता. एवढे मात्र खरे की, जवळ्पास मागील ७ वर्षांपासून (कदाचित या अगोदरही) Internet वर जाउन surfing करणे (विविध साईट पहाणे आणि त्यांचे वाचन करणे) यामुळे माझ्या ज्ञानात खुप भर पडत गेली आणि Internet surfing मध्ये मी पारंगत झालो. याचा फायदाही मला माझ्या दैनंदिन आणि ऑफिस च्या कामात होत गेला. प्रचंड माहितीचे हे भंडार खरेच काय असते याचा मला पुरेपुर अनुभव आला.
मला एखादा प्रश्न पडल्यानंतर Google या search engine वर जाउन कमीत कमी वेळेत त्याचे उत्तर कसे शोधायचे याचे मर्म समजले. (ज़रा आठवून पहा तो काळ - त्यावेळी Internet Cafe वर साधारणत: १९९०-९१ साली, एका तासाला रुपये ६०-७० असा charge होता.) ऑफिस मध्ये (कंपनीत) एखाद्या अडलेल्या कामाबद्दल किंवा technical बाबतीत जर कोणाला माहिति हवी असेल तर M.D. पासून ते माझ्या Boss पर्यंत सर्वाना हे माहीत होते "की इस मर्ज की दवा सिर्फ़ देबू के पास है".
अर्थात त्यामुळे कंपनीत माझा भाव ही वाढला होता म्हणा आणि त्याचा फायदा मला माझ्या प्रत्येक येणा-या increment मध्ये होत गेला. तात्पर्य हे की, Internet वर गेल्यानंतर तुम्ही तुमचा वेळ फालतू कामात वाया घालवू नका (उदाहरणार्थ, pornography किंवा तत्सम अश्लील साहित्य बघणे वगैरे) कारण इथेच तुमची ब्लॉगिंग या क्षेत्रात येण्याची बीजे रोवली जातात.
मला एक सांगा, Internet वर गेल्यानंतर तुम्ही जे काही वाचता Blog म्हणा किंवा एखादी website. तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय का, की एख़ादी व्यक्ति एवढे चांगले किंवा वाईट कसे लिहू शकतो आणि आपले मत, अभिप्राय निर्भिडपणे कसे मांडू शकतो?
मला माहीत आहे तुम्ही या गोष्टीचा कधीच विचार केला नाहित कारण तुम्ही Internet हे एक फ़क्त करमणुकीचे साधन म्हनुनच पाहात गेलात. खरेतर इथे "Think Beyond the Boundaries" असा विचार करायला हवा.
01. Blog : Learn And Earn (ब्लॉग - शिका आणि कमवा)
02. What is Blog? (ब्लॉग म्हणजे काय?)
03. Blog : Read and Earn More (ब्लॉग : जेवढे वाचाल तेवढे कमवाल)
No comments:
Post a Comment