जुन्या काळी बरेचसे पालक आपल्या शाळेत जाणा-या मुलांना रोजनिशी लिहिण्याचा सल्ला द्यायचे. याचे दोन फायदे होते. एकतर, मुलांचे भाषाकौशल्य आणि हस्ताक्षर सुधारण्यास मदत होत असे. फायदयाच्या चौकटितुन जर याचा विचार केला तर त्याचा असा परिणाम साधायचा की ते त्यांच्या मुलांनी दररोज करीत असलेल्या शालेय वा इतर activities तसेच शाळेत केलेल्या गंमती जमती चे रेकॉर्ड तयार व्हायचे. पुढे काही वर्षानी तो मुलगा मोठा झाला की तीच रोजनिशी तो जेव्हा वाचत असे तेव्हा बालपणाच्या रम्य आठवणींचा पडदा त्यांच्या चक्षु समोर येत असे. तेव्हा नक्कीच त्यांच्या मनात “बालपणीचा काळ सुखाचा” या म्हणीचा प्रत्यय येत असे. ज़रा आठवून बघा तुमचा बालपणीचा काळ! काही आठवतेय कां? नक्कीच नाही. कारण आपण सर्वजण कदाचित संसाराच्या गाडयाला जुंपलो गेलो असूयात अथवा आयुष्यात तग धरण्यासाठी आपली चाललेली धावपळ असेल. या सर्वात ते महत्वाचे म्हणजे आपण अनुभवलेले ते सोनेरी अम्रृततुल्य क्षण आज आपल्या जवळ नाहित. किंबहुना ते आपल्याला आठवत नाहित. त्यासाठीच Diary (रोजनिशी) लिहिणे किती महत्वाचे आहे त्यावरून कळून येईल.
असे दिसून आले आहे की ही रोजनिशी लिहिणारी व्यक्ति (तो अथवा ती) ही त्या रोजनिशिची अगदी जवळचा मित्र झालेली आहे. स्वत:ची एक वैयक्तिक जागा, लेखकाचे स्वत:चे विचार आणि कल्पना ज्या त्याने या रोजनिशी मध्ये लिहिल्या आहेत ते त्याच्या आयुष्याचे एक खरेखुरे प्रतिबिंब असते. या मुळे ही रोजनिशी करमणुक प्रधान आणि वाचनीय होते. अशीच एका व्यक्तिची आणि तिच्या रोजनिशिची मला प्रकर्षाने आठवण होते आहे. ती व्यक्ति म्हणजे Anne Frank. Anne Frank ने दुस-या महायुद्धाच्या काळात नाझी जुलुमाखाली असलेला तो प्रांत आणि त्याने होणारी तिची आणि तिच्या कुटुंबाची ससेहोलपट याचा इतिहास शब्दबध्द केला आहे. इतकेच नव्हे तर तो जगप्रसिद्धही झाला आहे. तुमच्या कामकाजातुन तुम्हाला जर वेळ मिळाला तर तो अवश्य वाचून काढा एवढेच इथे सांगेन.
हा दुःख:द इतिहास जरा एक वेळ बाजुला ठेवूयात. रोजनिशी मधील हा मजकुर - काही हरकत नाही तो लेखकाच्या नजरेतून दररोज लिहिलेला असेल अथवा आठ्वड्यातून एकदा किंवा दोनदा; तो नेहमीच सामान्य माणसाला त्या-त्या वेळी करमणुक प्रधान वाटत असतो.
अजुन काही वाचनीय लेख:
01. Blog : Learn And Earn (ब्लॉग - शिका आणि कमवा)
02. What is Blog? (ब्लॉग म्हणजे काय?)
03. Blog : Read and Earn More (ब्लॉग : जेवढे वाचाल तेवढे कमवाल)
04. Blog : An Experience (ब्लॉग : एक अनुभव)
05. Just Consider Learning Styles When Blogging (ब्लाँगिंगची Learning Style का गृहीत धरावी लागते?)
No comments:
Post a Comment