मित्रांनो, ब्लॉगचे नांव हे त्या ब्लॉगसाठीचे हृदय असते यात काही शंकाच नाही. ब्लाँगचे नांव हा एक महत्वाचा घटक असून तो तुमच्या ब्लॉगला आणि अर्थातच तुम्ही लिहिलेल्या लेखांना एक नवा आयाम देत असतो. त्यामुळेच आकर्षक ब्लॉगची नावे ही त्या-त्या ब्लॉग पोस्टला अथवा त्या ब्लॉगचा लेखांना दिली जातात. त्यामुळे वाचकवर्ग हा त्या आकर्षक ब्लॉगच्या नावांना अथवा लिहिलेले लेख वाचून त्याकडे आकर्षित होतो आणि नेहमी तुमचा ब्लॉग तपासत असतो. या वाढलेल्या वाचक वर्गामुळे तुमचा हा ब्लॉग search engine मध्ये महत्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे खरेतर आकर्षक ब्लॉगचे नाव लिहिणे हे खूप सोपे असते.
ब्लाँग चे नांव निवड़्ण्यापुर्वी तुम्हाला ब्लॉग चे title आणि domain name मधील फरक कळणे आवश्यक आहे. ब्लाँगचे नांव शोधताना बहुतांशी ब्लॉग वाचकांचा गोंधळ उडत असतो तो केवळ ब्लाँग चे title आणि domain name यातील फरक न कळाल्यामुळेच. त्यामध्ये त्या ब्लाँग ची URL ही सुद्धा एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे ब्लाँग चे आकर्षक नांव निवड़ताना प्रथम तुमच्या डोक्यातील तसेच मनातील हा गोंधळ दूर होणे आवश्यक आहे.
Domain Name किंवा त्या ब्लाँग ची URL ही तुमचा ब्लाँग ओळखण्याची महत्वाची खुण आहे. म्हणजेच असा शब्द जो तुम्ही कोणत्याही Internet Browser च्या address bar वर जाउन टाइप करता आणि मग तो ब्लाँग समोर येतो. जसे की जर तुम्हाला Facebook या वेबसाइट वर जायचे असेल तेव्हा तुम्ही www.Facebook.com हा address, address bar वर टाइप करता जो तुम्हाला Facebook या site वर घेउन जातो. हे लक्षात ठेवा की प्रत्येक URL ही इतरांपासून वेगळी असते त्यामुळे एक URL ही दोन वेगवेगळ्या website ना एकच असेल असे कधीही होत नाही.
त्यामुळे आकर्षक आणि सहज समजणारे, लक्षात रहाणारे domain name शोधताना या गोष्टी लक्षात ठेवा.
Blog title हे दुसरे काही नसून तुमच्या ब्लाँग चे नांव असते जे तुम्ही ते टाइप केल्यानंतर browser च्या title bar वर दिसून येते. जेव्हा जेव्हा तुम्ही त्या-त्या website ला भेट देत असता तेव्हा तेव्हा तुमच्या ब्लाँग चे title हे तुम्हाला त्या website च्या वर आणि address बारच्या खाली दिसून येते.
स्वत:चा ब्लाँग प्रसिद्ध करण्यासाठी (popular करण्यासाठी) आणि तुमच्या ब्लाँगचे वाचक वाढण्यासाठी ब्लाँग ला आकर्षक (आठवणीत राहील असे) चटकन लक्षात रहाण्याजोगे नांव देणे हा एक महत्वाचा घटक ठरत असतो.
त्यामुळेच आजचा हा लेख तुमच्यासाठी लिहित आहे. ब्लाँगला नांव देण्यापुर्वी खालील काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात.
१. तुम्ही तुमच्या ब्लाँग चे किती आणि कसे वेगळेपण जपणार आहात?
२. त्यामधून समाजाला काय संदेश देणार आहात?
३. त्यातील चित्र (images) सुसंगत संदेश देणार आहेत काय?
४. तुमच्या ब्लाँग वर एक नजर टाकल्यानंतर त्यातील कोणता भाग हा तुमच्या लक्षात रहाणारा आहे?
हे वरील सर्व महत्वाचे घटक ब्लाँग ला नाव देताना लक्षात ठेवावे लागतात. खरेतर ब्लाँगला नाव देताना ब्लाँग चा विषय आणि तेव्हा तुमची असलेली मानसिकता ही महत्वाची ठरू शकते.
ब्लाँग चे नांव हे -
- वाचतायेण्याजोगे असावे
- सहज उच्चारण करता येण्याजोगे असावे
- सहज लिहिता येण्याजोगे असावे
- सहज लक्षात राहील असे असावे
- थोड्क्या शब्दांत बरेच काही सांगणारे असावे
- वेगळेपण जपणारे असावे
या पुढे ही मी असे म्हणेन की, ब्लाँग चे नांव हे तुम्ही काय मत व्यक्त करणार आहात त्याचा तो एक सुंदर आरसा असावा.
उदाहरणच जर द्यायचे झाले तर, माझा "India On Wheels" हा ब्लाँग पहा. यामध्ये पर्यटन (tourism, tour, travel, accommodation, वगैरे. ) या विषयावरिल लेख आहेत. आपल्याला जर “Palace On Wheels” हे माहीत असेल तर “India On Wheels” हे चटकन लक्षात रहाते आणि हो Google मध्ये “India On Wheels” सर्च करताना माझा हा ब्लाँग पहिल्या एका लिंक मध्ये दिसू शकतो.
ब्लाँगच्या मार्फ़त फ़ायदा करून घेण्यासाठी वाचक वर्ग मिळविण्यासाठी चे माझे एक साधे गणित आहे.
“लक्षात रहाण्याजोगे ब्लाँग चे नांव ठेवा आणि तसे तुमचे मत त्यातून व्यक्त करा”
आकर्षक ब्लाँग चे नांव = तुमचा वाचक वर्ग + फायदा
हेच ते एक सूत्र आहे.
ब्लाँग साठी आकर्षक नांव शोधण्याच्या या मोहिमेत तुम्ही सर्वानी खालील गोष्टींवर विचार करणे गरजेचे आहे.
- तुमचा ब्लाँग कोणासाठी आहे
- यामधून तुमच्या ब्लाँग वाचकांचा काय फायदा होणार आहे
- तुम्ही तुमच्या ब्लाँग मधून काय व्यक्त करणार आहात.
- तुमची तुमच्या ब्लाँग चे नांव कशा प्रकारे आणि कुठे वापरणार आहात.
याव्यतिरिक्त तुम्हाला जर अजून काही माहिती असेल तर तुम्ही इथे comments च्या स्वरूपात शेयर करू शकता.
तुमच्या मनात नक्की काहीतरी चांगले असलेच तरीही माझ्या या खालील ३ टिप्स आकर्षक ब्लाँग चे नांव निवडताना लक्षात ठेवाव्यात.
०१. सकारात्मक विशेषणांचा वापर करा
विशेषण हे वाचकांच्या मनात तुमच्या ब्लाँग बद्दल एक संदर्भ चित्र निर्माण करत असते. त्यामुळे अशा विशेषणांचा वापर करा की त्यातून सकारात्मक भावना या तुमच्या मौल्यवान वाचकांपर्यंत पोहोचतील.
२. ब्लॉग चे नांव छोटे आणि सहज ठेवा : Keep It Short And Simple (KISS)
होय! KISS अर्थात (Keep It Short And Simple) म्हणजेच छोटे आणि सजह लक्षात रहाण्याजोगे. हा एक महत्वाचा घटक आहे हे लक्षात असू द्या. ब्लाँग चे नांव असे निवडा की ते सहजरित्या समजण्यास आणि आठवणीत रहाणारे असावे. लोकांनी जर तुमच्या ब्लाँग बद्दल बोलावे असे वाटत असेल तर ब्लाँग चे नांव हे सहज आणि सोपे असावे.
३. Enjoy And Be Creative (क्रियाशील रहा)
ब्लाँग साठी अचूक किंवा perfect नांव असावे या साठी आग्रही राहू नका आणि त्यासाठी स्वत:चे डोकेही शिणवु नका. जास्त डोके शिणल्याने तुमची क्रियाशीलता (Creativity) कमी होण्याची शक्यता आहे. त्याऐवजी तुम्ही जो काही ब्लाँग लिहिणार असाल त्या ब्लाँग च्या संहितेवर (विषयावर) लक्ष केंद्रित करा.
शेवटी सांगेन की, तुमचा ब्लाँग हा तुमचे प्रतिबिंब आहे. ही एक अशी ब्लाँगची दुनिया आहे की जिथे तुम्ही तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टी घेउन व्यक्त होत असता त्यामुळे लोक तुमच्या बाबतीत तुम्ही किती चांगले अथवा वाईट ब्लाँगर आहात हे ठरवित असतात.
So, Happy ब्लॉगिंग..!!!
हे सुद्धा वाचा :
No comments:
Post a Comment