Showing posts with label ब्लाँगचे उपयोग. Show all posts
Showing posts with label ब्लाँगचे उपयोग. Show all posts

Tuesday, September 14, 2010

The Uses of Blogs (ब्लॉगचे उपयोग)

Blog
मित्रहो, blogging क्षेत्रात येण्या अगोदर मी असे गृहीत धरतो की तुम्ही माझाBefore Moving Towards blogging (ब्लॉगिंग कडे जाण्यापुर्वी)” हा लेख वाचला असेल. आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करुयात.

बरेचजण जेंव्हा blog सुरु करतात तेंव्हा त्या मागे बरीचशी कारणे असतातकाही जण त्यांच्या आयुष्यात घड़णा-या घटना प्रामाणिकपणे जगासमोर मांडण्यास आसुसलेले असतात. यात त्यांना एक प्रकारचा आत्मसंतोष मिळत असतो. यामुळे होते काय की, हि प्रामाणिकपणे ब्लॉग लिहिणारी व्यक्ति ज्या देशात रहाणारी असेल त्या देशाचे तो अघोषित प्रतिनिधित्वच करीत असतो. त्याच देशातल्या राहाणा-या कुणी हजार जणांचे आयुष्यही त्याने लिहिलेल्या ब्लॉग मधील मजकुरास मिळतेजुळते होउन जाते. आणि मग या व्यक्ति एकमेकांची ओळख नसतानाही या ब्लाँगच्या माध्यमातुन एकमेकांचे सुख़-दुःख share करण्यास पुढे येतात. -याचदा यातून ब्लॉग लिहिणा-या व्यक्तीला मानसिक फायदा होउन तो आयुष्यातील एक-एक कठिण पायरी सांधु लागतो आणि हा ब्लॉग वाचणारी व्यक्ति मानसिकरित्या अजुन सक्षम होत जाते. हो अगदी नकळत... यातून मी गेलेलो आहे. खरेतर माझं life settle करायला या ब्लॉग नावाच्या परसाची खुप मदत झाली आहे. असो!