Pages

Subscribe:

Thursday, November 28, 2013

एक नविन लेखक म्हणून; रोजनिशी लिहिण्यासाठी तुम्हाला काही टिप्स आत्मसात करायला हव्यात. तुमच्या लिहिण्याच्या ध्येय यावर आधारित तुम्हाला तुमचे विचार किंवा भावना वर्णन करण्यासाठी तुम्ही तुमचे खाते सुरू करा. कविता किंवा लघुकथा लिहा, किंवा मग तुम्ही तुमची लेखन क्षमता वाढवू शकता. 

या गोष्टींचा तुम्ही तुम्हाला हवा तो अर्थ काढू शकता, इथे मी तुमच्यासाठी रोजनिशी सुरू करण्यासाठी ९ उपयोगी सूचना देत आहे (Nine helpful tips to start writing a journal).

०१. दररोज लिहा (Write Everyday):

मला तरी असे सुस्पष्ट दिसत आहे कि, हि रोजनिशी लिहिण्याची सुरूवात आहे. जे काही असेल ते, तुमच्या रोजनिशी मध्ये लिहा. तुमचे विचार, भावना, तुमच्या डोक्यात जे काही येत असेल ते लिहा. हे सर्व तुम्हाला तुमच्या लिहिण्याची सवय तयार करण्यास मदतच करेल. खरेतर हे म्हणजे तुमच्यासाठी पुढे जाण्याचा एक मार्गच आहे.

०२. हे सर्व तुमच्या बरोबर घेऊन चला (Carry it with you):

अर्थातच! यामुळे तुम्हाला दररोज लिहिण्याची सवय लागेल. मी नेहमी एक छोटीशी नोटबूक जी माझ्या खिशात सहजपणे मावेल ठेवत असतो. ती नोटबुक मला नेहमी काहीतरी लिहिण्यासाठी स्मरण करून देते. तुम्ही जर तुमची रोजनिशी लिहिण्याचे विसरलात तर तुम्ही काही नोट्स तुमच्या सेल फोनमध्ये घेऊन त्या नंतर रोजनिशी लिहिण्यासाठी वापरू शकता. 

०३. तुमच्या सेल फोनवर रीमाइण्डर सेट करून ठेवा (Set a Reminder on Your Phone):

बाकी लोकांसारखे (जिकडे जाईल तिकडे) मी माझा सेलफोन माझ्या बरोबरच ठेवतो. कारण माझ्या गरजा भागविण्यासाठी मी अनेकदा त्याच्या वापर करू शकतो. प्रत्येक काही तासानंतर रोजनिशी लिहिण्यासाठीचे स्मरण करून देण्यासाठी मी टाइमर लावून ठेवत असतो. ते प्रत्येक वेळेस रिंग वाजवून मी करत असलेले काम थांबायला लावते आणि एक मिनिट रोजनिशी लिहिण्यासाठी वापरायला लावते. 

०४. एक चांगली रोजनिशी लिहायला हवी (Have a Cute Journal):

जेव्हा तुम्ही एक चांगली रोजनिशी लिहिण्याचे ठरवता तेव्हा त्या पानांना तूमच्या लिहिलेल्या विचारांनी आकर्षकपणा येतो. मला माझ्या एका मित्राने एक नोटबुक दिले आहे ज्याचे पहिले आणि शेवटचे पृष्ठ सुशोभित केलेले आहे. ते नोटबुक मला त्यामध्ये लिहावे यासाठी नेहमी उद्धुक्त करत असते. मी देखील त्यामध्ये एका विशेष पेनाने ती रोजनिशी लिहित असतो आणि ती नेहमी माझ्याबरोबर ठेवत असतो. याच प्रकारे, रोजनिशी लिहिणे म्हणजे एक प्रकारचा भव्य प्रसंग असतो याची नेहमी मला प्रचीती येत असते. 

०५. अधिक वाचा (Read More):

वाचन हे तुमचे विचार आणि कल्पना ढवळून काढण्यास मदत करते, जे नंतर एक रोजनिशिमधील सुंदर लेखन बनून जाते. वाचन हे आपल्याला आपले विचार, मत विस्तृत करण्यास मदत करते. वाचन हे आपल्याला माहित नसलेल्या गोष्टींचे आव्हाने स्वीकारायला तसेच नवीन दृष्टांत मिळविण्यासाठी मदत करतात. कोणतेही एक जुने गाजलेले पुस्तक उचला किंवा एखादे नवीन पुस्तक जे तुम्हाला नेहमी वाचावयास आवडते तिथून सुरुवात करा. जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर इंटरनेटवर काही लघुकथा किंवा कविता शोधा आणि वाचा. "वाचाल तर वाचाल" हि म्हण लक्षात असू द्या. 

०६. शब्दांबरोबर खेळा (Play with Words):

अलीकडे मी अधिकाधिक चटकन लिहून घेतलेल्या छोट्याशा टिप्स यांची लिस्ट करत असतो आणि त्या टिप्स एकत्र करून त्यामधून एक संलग्न आणि अर्थपूर्ण विचार मांडायचा प्रयत्न करत असतो. कधी कधी हा प्रयत्न चालून जातो, कधी चालत नाही. या सगळ्याचे सार एकच, ते म्हणजे, हे शब्द (शब्दांचे हे खेळ) एकमेकांबरोबर कसे काम करतात याचा तुमच्या मनात विचार सुरू करण्याची प्रक्रिया करत असतात. मी जेव्हा अडखळतो तेव्हा मला मदत करते ती मी तयार केलेली लिस्ट, परत मी त्या तयार केलेल्या लिस्ट कडे जातो आणि हे पहातो ( रोजनिशी लिहिण्यासाठी) कि कोणते शब्द चालतात आणि कोणते नाहीत. 

०७. तुमच्या भोवतीच्या सर्व बाबींची नोंद घ्या (Take Note of Everything around You):

कधीकधी मी दररोज आयुष्यात घडत असलेल्या गोष्टीं लिहित असतो, किंवा मी कार्य करीत असताना जे नेहमी पहातो ते लिहित असतो. सभोवतालच्या या गोष्टी नंतर मला लघुकथा किंवा कविता करण्यास प्रेरणा देतात. याचबरोबर या गोष्टी मला जगात चाललेल्या गोष्टींची दाखल घेण्यास भाग पाड्तात. रोजनिशी लिहिण्यासाठी हि एक सुंदर आणि प्रेरक गोष्ट आहे. या विविध प्रकारच्या व्यायामाचे सार एवढेच कि, हे सगळे तुम्हाला सर्व वेळ लिहित रहाण्याची, किमान विचार करण्याची संधी देते.

०८. लेखकाच्या जागेची काळजी करू नका (Don't Worry about Writer’s Block!):

लेखकांची जागा हि प्रत्येक लेखकासाठी एक नैसर्गिक अनुभव असतो. या प्रक्रियेस आलंगण  देऊन त्याचा आनंद घ्या. असे जर घडले तर, रील्याक्स रहा. लेखन हे छोटेसे काम नसून ती एक गंमत असते. जर तुम्हाला एखाद्या दिवशी लिहावेसे वाटत नसेल तर काही हरकत नाही. कदाचित तुम्ही त्या दिवशी निसर्गाच्या सानिध्यात फिरावयास जा, किंवा मग वाफाळलेल्या चहाबरोबर शांतपणे एका ठिकाणी बसून पुस्तक वाचा. कुणास माहित? हि गोष्ट तुम्हाला लेखनाच्या विभागात कदाचित मदतही करेल!

०९. प्रारंभ (Start):

आज, आत्ता लगेच सुरुवात करा. तुम्हाला नेहमी जे काहीतरी करावयाचे होते त्यासाठी "आत्ता" हीच सर्वोत्तम वेळ आहे. जरी ते तुम्ही restaurant मधील napkin च्या तुकड्यवरिल लिहिलेले असेल अथवा सुंदर अशा लेदरचे आवरण असलेल्या रोजनिशी मध्ये लिहिलेले असेल, प्रत्यक्षात लिहिणे सुरु करा. उर्वरित टिप्स या तुम्हाला लिहिण्याची सवय जोपासण्यासाठी नक्कीच मदत करेल.

;;