Pages

Subscribe:

Saturday, July 30, 2011

अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम वर्ष प्रवेशाच्या पहिल्या यादीनुसार प्रवेश घेण्याची मुदत शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता संपली. दुसऱ्या फेरीत उपलब्ध असलेल्या जागा व त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी शनिवारी सायंकाळी पाच वाजता संकेतस्थळावर जाहीर होणार आहे.


प्रवेशाच्या पहिल्या फेरीत 68 हजार 800 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. उर्वरित 34 हजार 800 विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही. पहिल्या फेरीत प्रवेशासाठी नाव जाहीर होऊनही प्रवेश न घेतलेले विद्यार्थीही दुसऱ्या यादीत त्यांचे नाव आल्यास प्रवेश घेऊ शकतील. शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या यादीत कोणत्या महाविद्यालयात किती जागा आहेत व त्या प्रवेशाला पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर होणार आहेत. 1 ते 3 ऑगस्टदरम्यान त्यांना संबंधित महाविद्यालयांसाठी अर्ज भरता येतील. 5 ऑगस्ट रोजी प्रवेशाची यादी जाहीर होणार आहे. ही यादी विद्यार्थ्यांना www.dte.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. 

;;