पहिल्या भागातील म्हणजेच "Making the Blog (ब्लॉग तयार करताना) - १" या लेखातील मजकुर आपण वाचला असेलच आता आपण परत एकदा search engine कडे वळुयात. मागील लेखात सांगितल्या प्रमाणे तुम्ही लिहिलेला लेख search engine मध्ये सर्च करुन बघितल्यावर (शोधल्यानंतर) तुम्हाला काही link दिसतील. त्यातील कोणतीही एक link click करुन बघितल्यावर समोर येणारी webpage (त्या विषयाची) मधे एकतर शेवटी (म्हणजे त्या लेखाच्या शेवटी) किंवा अगदी सुरुवातीला “Comments” या नावाचा शब्द दिसेल. या Comments नावाच्या शब्दाचे या ब्लॉग मीडिया मध्ये खुप महत्वपूर्ण भूमिका आहे.
आता तुम्ही तो लेख वाचल्यावर तुमचे स्वत:चे मत/अभिप्राय (अर्थात विषयाला धरून) हा दोन किंवा ३ lines मध्ये लिहायचे असते. याचा उपयोग काय तो आपण नंतरच्या लेखात बघुयाताच. हा Comments नावाचा भाग म्हणजेच तुम्ही तुमचे प्रामाणिक मत (मग ते होकारार्थी असेल, नकारार्थी असेल अथवा काही सूचना वा विषयाला धरून तुम्हाला आठवलेला एखादा प्रसंग असेल) मांडणे होय. या मत/अभिप्राय मांडण्याच्या प्रकाराने होते काय की, ज्या कोणी हा लेख लिहिलेला असेल तो ते मत/अभिप्राय वाचतो आणि बहुतेक करुन त्याचं उत्तरही देतो. यालाच “Two-Way Communication” (दुतर्फा संदेशाची देवाणघेवाण) असे म्हणतात. जेवढ्या जास्त चांगल्या Comments तेवढाच वाचक वर्ग वाढण्यास मदत होत रहाते. आणि google search engine मध्ये तुमचा ब्लॉग indexed (गूगल सूची मध्ये अंतर्भूत होणे) व्हायला मदत होत रहाते (google index साठी इथे click करा). खरेतर तुमचा ब्लॉग google index होण्यासाठी अजुन ब-याच गोष्टिंची आवश्यकता असते हे नाकारून चालणार नाही. ते ही आपण या नंतर बघणार आहोतच. तुर्तास एवढेच लक्षात ठेवा की जसे तुम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये लेख लिहित असता आणि वाचकानी तुमच्या या लिखाणावर मत/अभिप्राय व्यक्त करणे अपेक्षित असते तसेच इतर bloggers च्या बाबतीतही असेच असते हे जास्त करुन लक्षात ठेवणे आवयशक आहे.
तुम्हाला आवडलेले ब्लॉग (इतर विषयावरील) तुम्ही bookmark करून ठेवू शकता. bookmark बाबत येणा-या लेखात सविस्तरपणे उल्लेख होईलच. इथे एक सांगावेसे वाटते की माझ्या या ब-याच लेखांमधे मी इंग्रजी शब्द जशाच्या तसे वापरत आलो आहे. ते यासाठी की हे इंग्रजी शब्द जो पर्यंत तुम्ही या ब्लॉग मिडियाशी संबंधित असणार आहात तेव्हा-तेव्हा तुम्हाला सामोरे येतील. या शब्दांचा सराव व्हावा हाच एकमेव उद्देश डोळ्यांसमोर असल्यामुळे शक्य होइल तितक्या वेळेस मी या इंग्रजी शब्दांचा वापर हेतुपुरस्सर केलेला आहे. तुर्तास इथेच थांबू यात. अजुन बरेच काही लिहायचे आहे ते पुढिल लेखात सविस्तर पाहू या!
अजुन काही वाचनीय लेख:
01. Blog : Learn And Earn (ब्लॉग - शिका आणि कमवा)
02. What is Blog? (ब्लॉग म्हणजे काय?)
03. Blog : Read and Earn More (ब्लॉग : जेवढे वाचाल तेवढे कमवाल)
04. Blog : An Experience (ब्लॉग : एक अनुभव)
05. Just Consider Learning Styles When Blogging (ब्लाँगिंगची Learning Style का गृहीत धरावी लागते?)
06. Before Moving Towards Blogging (ब्लॉगिंग कडे जाण्यापुर्वी)
07. The Uses of Blogs (ब्लॉगचे उपयोग)
08. Types of Blogs (ब्लॉगच्या पद्धती)
09. Blog Statistics (ब्लाँग सांख्यिकी आणि इतर काही माहिती)
10. Making the Blog (ब्लॉग तयार करताना) - १
No comments:
Post a Comment