Sunday, May 24, 2009

Blog : An Experience (ब्लॉग : एक अनुभव)

या सर्व प्रकारामधे कुठून आणि कशी सुरुवात करायची हे जरी माहीत नसले तरी काही हरकत नाही. माझा हा मराठी मध्ये ब्लॉग लिहिण्याचा हाच तर एकमेव उद्देश आहे. मराठी तरुणाई जी आज आपली स्वत:ची अशी एक जागा तयार करण्यास धडपडत आहे. त्यांच्यासाठी तर ब्लॉग हे खरोखर खुप मोठे वरदान आहे. कदाचित हे सर्व वाचून मी अतीशयोक्तिपुर्ण विधाने करीत आहे असेच प्रत्येकाला वाटेल. परंतु म्हणतात ना की, स्वानुभव हाच खरा शिक्षक असतो! तसेच आहे हे!

Thursday, May 21, 2009

Blog : Read and Earn More (ब्लॉग : जेवढे वाचाल तेवढे कमवाल)



Blog म्हणजे काय हे शिकण्यासाठीचा एक चांगला मार्ग म्हणजे ब्लॉग चे वाचन. जेवढे वाचाल तेवढे कमवाल!

ब्लॉग वाचा! comments टाका! आणि जो ब्लॉग वाचताय किंवा त्या ब्लॉग चे article वाचताय त्या ब्लॉग लेखकाला तुम्हाला आवडलेल्या अथवा आवडलेल्या भागावर तुमचे मत (अभिप्राय) comments च्या रुपाने त्या ब्लाँगवर नोंदवा. (हे असे का करायचे आणि त्याने काय फायदा होतो ते आपण नंतर सविस्तर बघुयात)